संघटन सृजनमुळे सोलापुरात काँग्रेस अॅक्टिव मोडमध्ये; पदांसाठी मुलाखतींना मोठा प्रतिसाद
सोलापूर, 09 एप्रिल (हिं.स.)। काँग्रेसच्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसमध्ये संघटनात्मक बळकटीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शहर-जिल्हाध्यक्ष तसेच विविध ब्लॉक आणि फ्रंटल पदांसाठीच्या मुलाखती उत्साहपूर्ण वातावरणात
Nd


सोलापूर, 09 एप्रिल (हिं.स.)।

काँग्रेसच्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसमध्ये संघटनात्मक बळकटीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शहर-जिल्हाध्यक्ष तसेच विविध ब्लॉक आणि फ्रंटल पदांसाठीच्या मुलाखती उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे आणि माजी आमदार प्रकाश येलगुळवार यांनी निरीक्षकांचे स्वागत केले.

पक्ष संघटन अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात असून, महाराष्ट्रात तळागाळापर्यंत काँग्रेसची पकड मजबूत करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे.

या उपक्रमांतर्गत शहर काँग्रेस अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि विविध फ्रंटल संघटनांच्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेत एआयसीसी निरीक्षक देबाशिष पटनाईक, प्रदेश निरीक्षक धिरज देशमुख, यशराज पारखी, भाऊसाहेब आसबे तसेच प्रदेश सरचिटणीस डाॅ. दिनेश नवगिरे यांनी सहभाग घेतला.

काँग्रेसची विचारधारा आणि जनहिताच्या धोरणांना अधिक प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान “गेम चेंजर” ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande