
डोंबिवली, 09 एप्रिल (हिं.स.)पश्चिम विभागातील मोठागाव येथील माणकोली उड्डाणपुलावर तिघांनी मोटरसायकलवर स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या साहसी खेळात मोटरसायकलस्वाराचे मागील सिटवर बसलेल्या मित्राने डोळे झाकले होते. डोळे बंद करून मोटरसायकल चालवीत असल्याने स्टंटबाजी करून अपघात झाल्यास एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये मानकोली ब्रिज येथे स्टंटबाजी करणारे गणेश राजू फोंडा रेड्डी (वय 22 वर्षे), कबीर मच्छिंद्र नेतकर (वय 22) व यश नितेश मालवणकर (वय 23) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. मंगळवारी ७ तारखेला मोठागाव माणकोली ब्रिज जवळ होंडा एक्टिवा गाडी क्रमांक MH 05 EU 8768 ही धोकादायक रीतीने ट्रिपल सीट चालवून त्याची रील बनवून इंस्टाग्राम वर पोस्ट केली होती. विष्णूनगर पोलिसांनी याचा शोध घेऊन बुधवारी ८ तारखेला विष्णनगर पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्या विरोधात MV ऍक्ट कलम 184,128,129 अन्वये कारवाई करण्यात आली असून गाडी ट्राफिक पोलीसांच्या मदतीने जमा केली असल्याची माहिती विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वपोनि राम चोपडे यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi