नांदेड - हिमायतनगर शहरात दोन गटात एकमेकांवर तलवारी व चाकूने हल्ला
नांदेड, 09 एप्रिल (हिं.स.)। हिमायतनगर येथे राजकीय वैमनस्यातून दोन गटांमध्ये आठवडी बाजाराच्या दिवशी दिवसाढवळ्या धारदार शस्त्रांनी दोन गटात जीवघेणा हल्ला झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना वैद्यकीय उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात
नांदेड - हिमायतनगर शहरात दोन गटात एकमेकांवर तलवारी व चाकूने हल्ला


नांदेड, 09 एप्रिल (हिं.स.)। हिमायतनगर येथे राजकीय वैमनस्यातून दोन गटांमध्ये आठवडी बाजाराच्या दिवशी दिवसाढवळ्या धारदार शस्त्रांनी दोन गटात जीवघेणा हल्ला झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना वैद्यकीय उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. सदर घटनेमुळे हिमायतनगर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना तालुका हिमायतनगर येथील बाजारपेठेतील उमर चौकात घडली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाने अचानक उग्र रूप धारण केले. दोन गट आमने सामने येऊन तलवारी, चाकू यांसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करत एकमेकांवर हल्ला करण्यात आला आहे. हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भर बाजारपेठेत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आली असून पुढील तपास सुरू आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande