शिरोली एमआयडीसीत अनधिकृत खोकी, पार्कींग शेड्सवर कारवाई
कोल्हापूर, 09 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रात विद्रुपीकरण अनधिकृत खोकी,आणि अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरु केली आहे. एमआयडीसीमधील रस्ते आणि मोकळ्या जागांवर अनधिकृत खोकी, बांधकामे, पार्किंग शेड्स प्रचंड
शिरोली एमआयडीसीत अनाधिकृत खोक्यांवर कारवाई


कोल्हापूर, 09 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रात विद्रुपीकरण अनधिकृत खोकी,आणि अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरु केली आहे. एमआयडीसीमधील रस्ते आणि मोकळ्या जागांवर अनधिकृत खोकी, बांधकामे, पार्किंग शेड्स प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सुरु केलेल्या या विशेष अतिक्रमण हटाव मोहीमेस कागल पंचतारंकित एमआयडीसीत सुरुवात केली. त्यानंतर शिरोली एमआयडीसी मध्ये ही मोहिम सुरु झाली. रस्ते रुंदीकरण, वाहतूकीस अढथळे, बेकायदेशीर फोफावलेले धंदे, याला आळा घालण्यासाठी अनधिकृत अतिक्रमणे हटवणे गरजेचे बनले होते.

शिरोली औद्योगिक वसाहतींत मुख्य रस्त्यांवर, मोक्याच्या जागांवर वाढलेली प्रवेशाच्या खोकी, काही कंपन्याची वाहने पार्किंग आणि माल ठेवण्यासाठी उभारलेली शेड्स अशी 80 हून अनाधिकृत खोकी शेड्स बांधकामे एमआयडीसी च्या पथकाने पोलिस पथकाच्या सहाय्याने काढून टाकली यासाठी 3 जेसीबी, 3 ट्रॅक्टर ट्रॉली, १ पोकलँड, १ डोझर, एमआयडीसी कार्यालयाचे २५ हून अधिक कर्मचारी, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून मोठा पोलिस फौजफाटा यांचा वापर करण्यात आला. उर्वरीत सर्व अतिक्रमणे काढून टाकणार असून पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत याचीही दक्षता घेणार असल्याचे तसेच गोकूळ शिरगाव एमआयडीसी मध्येही ही कारवाई होणार असल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ए. आय. नाईक यांनी सांगीतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande