लातूरमध्ये महावितरणच्या ४८ गुणवंत कामगारांचा गौरव
लातूर, १ मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य स्थापना दिन (१ मे) निमित्त महावितरणच्या परिमंडल कार्यालयात राष्ट्रध्वज वंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. याचवेळी आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्त आयोजित गुणवंत कामगार गौरव समारंभात ४८ तांत्रिक कामगारांचा
महावितरण


लातूर, १ मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य स्थापना दिन (१ मे) निमित्त महावितरणच्या परिमंडल कार्यालयात राष्ट्रध्वज वंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. याचवेळी आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्त आयोजित गुणवंत कामगार गौरव समारंभात ४८ तांत्रिक कामगारांचा सन्मान करण्यात आला.

मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्या हस्ते ७ यंत्रचालक आणि ४१ तंत्रज्ञ कामगारांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर, सहाय्यक विधी अधिकारी श्रीकांत चेडे, उपव्यवस्थापक प्रिया शितोळे, सहाय्यक अभियंता सुदर्शन बोळेगावे, निम्नस्तर लिपिक अमीत नाचणे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या गौरव सोहळ्यात उत्कृष्ट वीजसेवा देत ग्राहकांमध्ये महावितरणची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानित कामगारांमध्ये लातूर जिल्ह्यातील २०, बीड जिल्ह्यातील १५ आणि धाराशीव जिल्ह्यातील १३ कामगारांचा समावेश होता.

मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी बदलत्या वीजसेवा क्षेत्रात ग्राहकाभिमुख सेवा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अपघातमुक्त व सुरक्षित सेवा देण्यासाठी सतर्क राहणे आणि देखभाल-दुरुस्तीदरम्यान सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महसूल वाढीसाठी वीजबिल वसुलीची जबाबदारीही प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र चुनारकर यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ कुसभागे यांनी केले, तर आभार प्रदर्शन यशोदा पालकर यांनी मानले. कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande