चिपळूण तालुक्यातील खेर्डीत नदीत मेलेल्या माशांचा खच
रत्नागिरी, 01 मे (हिं.स.) । चिपळूण तालुक्यातील खेर्डी परिसरात नदीत मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. नदीच्या पाण्यावर शेकडो मासे तरंगताना दिसून आले असून काही ठिकाणी मेलेल्या माशांचा खच साचल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे
चिपळूण तालुक्यातील खेर्डीत नदीत मेलेल्या माशांचा खच


रत्नागिरी, 01 मे (हिं.स.) । चिपळूण तालुक्यातील खेर्डी परिसरात नदीत मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. नदीच्या पाण्यावर शेकडो मासे तरंगताना दिसून आले असून काही ठिकाणी मेलेल्या माशांचा खच साचल्याचे निदर्शनास आले.

या प्रकारामुळे नदीकाठच्या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून संभाव्य रोगराईबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार खेर्डी एमआयडीसी परिसरातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणीही करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande