
रत्नागिरी, 01 मे (हिं.स.) । पाचल (ता. राजापूर) येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. धनश्री दत्तात्रय मोरे यांना जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेला प्रतिष्ठेचा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' पुरस्कार आज महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते रत्नागिरीत प्रदान करण्यात आला.
यावेळी त्यांच्या पती दत्तात्रय मोरे, रत्नागिरीच्या सौ. शिल्पा सुर्वे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. सौ. मोरे यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सौ. मोरे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय असून महिलांच्या अडचणी सोडविणे, गरजू घटकांना मदत करणे, तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देणे यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या या सातत्यपूर्ण व निःस्वार्थ कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी