फ्लिपकार्ट, अॅक्सिस बँक आणि पेयूकडून कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची सुरुवात
मुंबई, 01 मे (हिं.स.) - फ्लिपकार्टया भारतातील स्वदेशी ई-कॉमर्स मार्केटप्‍लेसनेभारतातील सर्वात मोठी खाजगी बँक अॅक्सिस बँकआणि भारतातील आघाडीचा वैविध्यपूर्ण फिनटेक प्लॅटफॉर्म पेयूयांच्या सहयोगाने कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन लाँच करण्याची
फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक पेयू


मुंबई, 01 मे (हिं.स.) : फ्लिपकार्ट या भारतातील स्वदेशी ई-कॉमर्स मार्केटप्‍लेसने भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक अॅक्सिस बँक आणि भारतातील आघाडीचा वैविध्यपूर्ण फिनटेक प्लॅटफॉर्म पेयू यांच्या सहयोगाने कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन लाँच करण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांना प्रथम प्राधान्य देण्याच्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित या तीन विश्वसनीय संस्थांनी या उपक्रमासाठी सहयोग केला असून भारतीय ग्राहकांसाठी आपली सामूहिक वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

हा उपक्रम वापरकर्त्यांना पूरक अँड्रॉइड आणि आयओएस डिवाईसेसवर फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरून व्यवहारांना मान्यता देण्याची सुविधा देतो, ज्यामुळे वन-टाइम पासवर्डची (ओटीपी) आवश्यकता उरणार नाही. ही सेवा सर्वप्रथम अॅक्सिस बँकेच्या कार्डधारकांसाठी इश्यूअर-लेव्हल बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनद्वारे उपलब्ध करून दिली आहे. या लाँचसह, फ्लिपकार्ट कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन प्रदान करणाऱ्या भारतातील प्रमुख मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक बनले आहे.
हे वैशिष्ट्य ग्राहकांना डिवाईस फिंगरप्रिंटिंग आणि प्रगत तपासणीवर आधारित ऑथेंटिकेशनची अधिक सुरक्षित पद्धत देते, ज्यामुळे सिम-स्वॅप किंवा ओटीपी-आधारित फसवणूकीचा धोका कमी होतो. स्मार्टफोन वापरकर्त्यांना आधीच परिचित असलेल्या जलद आणि सुरक्षित यंत्रणेद्वारे हे वैशिष्ट्य एसएमएस-आधारित ओटीपीची जागा घेते आणि डिजिटल पेमेंटमधील अडचणी दूर करते. या सहयोगांतर्गत पेयू मर्चंट-साइड पायाभूत सुविधा, उपकरणाची सुरक्षा आणि ऑथेंटिकेशन प्रवाह व्यवस्थापित करते, तर अॅक्सिस बँक विब्‍मोच्या (पेयू कंपनी) मदतीने इश्यूअर-साइडवर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनची सुविधा प्रदान करते.
बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन भारतातील चिंताजनक डिजिटल पेमेंट फसवणूकीला आळा घालण्यास मदत करेल. आरबीआय-संबंधित आकडेवारीनुसार (RBI-linked data), आर्थिक वर्ष २०२४ मध्ये फसवणुकीचे मूल्य पाच पटीने वाढून १,४०० कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. याला प्रतिसाद म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँकेने 'ऑथेंटिकेशन मेकॅनिझम्स फॉर डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन्स डायरेक्शन्स, २०२५' ('Authentication Mechanisms for Digital Payment Transactions Directions, 2025) परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये एसएमएस ओटीपीऐवजी बायोमेट्रिक आणि जोखीम-आधारित ऑथेंटिकेशनचा अवलंब करण्यास स्पष्टपणे प्रोत्साहन दिले आहे. या नियामक व्हिजनशी धोरणात्मकरित्या सुसंगत असलेल्या फ्लिपकार्ट-पेयू-अॅक्सिस बँक भागीदारीमुळे सुरक्षा वाढते, व्यवहारांच्या यशाचा दर सुधारतो आणि आरबीआयच्या मजबूत डिजिटल ऑथेंटिकेशन यंत्रणेच्या आदेशांची पूर्तता करत एक अधिक स्थिर पेमेंट परिसंस्‍था तयार होते.
 
या लाँच प्रसंगी मत व्‍यक्त करत फ्लिपकार्टचे पेमेंट आणि सुपरकॉइन्स विभागाचे व्हाइस प्रेसिडेंट गौरव अरोरा म्हणाले, “फ्लिपकार्टमध्ये आमचा नवोन्मेषाचा दृष्टिकोन पक्के अनुपालन आणि ग्राहकांच्या विश्वासावर आधारलेला आहे. डिजिटल फसवणूकीचे धोके दिवसेंदिवस क्लिष्ट होत असताना, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वैशिष्ट्याचा समावेश हा ग्राहकांच्या पेमेंटला अधिक सुरक्षित करण्याप्रती आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. सुरक्षित बायोमेट्रिक क्रेडेन्शियल्सचा वापर करून, आम्ही ग्राहकांच्या संरक्षणाची उच्च मानके पाळत त्यांना एक सहज आणि अखंड पेमेंट अनुभव देत आहोत. डिजिटल कॉमर्सचा विस्तार होत असताना, सुरक्षित पेमेंटसाठी आवश्यक असलेली नियामक कठोरता आणि संपूर्ण परिसंस्थेतील विश्वासार्हता वाढवण्यासोबतच जलद व्यवहार सक्षम करण्यावर आमचा भर आहे.”शक्य 

 

अॅक्सिस बँकेच्या कार्ड्स, पेमेंट आणि वेल्थ मॅनेजमेंट विभागाच्या प्रेसिडेंट आणि हेड अर्णिका दीक्षित म्हणाल्या, “अॅक्सिस बँकेमध्ये आम्ही प्रत्येक डिजिटल टचपॉईंटवर विश्वास आणि सुरक्षा वाढवण्यासाठी सतत कार्यरत असतो. आजच्या काळातील ग्राहकांना डिजिटल पेमेंट केवळ सुरक्षितच नाही तर विनासायास हवे आहे आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरक्षित वन-टच मंजूरीचा अनुभव देऊन नेमके तेच साध्य करते. फ्लिपकार्ट आणि पेयूसोबतच्या सहयोगातून आमच्या कार्डधारकांसाठी ही प्रगत सुविधा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. हे लाँच आमच्या दीर्घकालीन भागीदारीची ताकद आणि सुरक्षा व ग्राहक अनुभवातील उद्योगाची मानके उंचावण्याप्रती आमची सामूहिक वचनबद्धता दर्शवते. डिजिटल कॉमर्सची उत्क्रांती होत असताना, आम्ही अशा नवकल्पना आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, ज्यामुळे आमच्या ग्राहकांसाठी पेमेंट अधिक सोपे, सहजसाध्य आणि भविष्यासाठी सज्ज होईल.”
 
या सहयोगाबद्दल मत व्‍यक्त करत पेयू पेमेंटचे चीफ बिझनेस ऑफिसर हेमांग दत्तानी म्हणाले, “भारतात डिजिटल कॉमर्सचा विस्तार होत असताना, सुरक्षिततेशी तडजोड न करता पेमेंट प्रक्रिया सोपी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्ड पेमेंटसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनुभव सक्षम करण्यासाठी फ्लिपकार्टसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यामुळे ग्राहकांना ओटीपी-आधारित पडताळणीशी संबंधित जुन्या अडचणींपासून सुटका मिळेल. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनला प्रगत सुरक्षा नियंत्रणांशी जोडून, ही भागीदारी भारतीय ग्राहकांसाठी अधिक जलद, सुरक्षित आणि विनाअडथळा डिजिटल पेमेंट अनुभव तयार करण्याच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल आहे.”
 
हा उपक्रम भारताच्या ओटीपीकडून होणाऱ्या संक्रमणातील एक पुढचे पाऊल आहे, जो अनुपालन आणि नियंत्रणाची उच्च मानके राखून वापरकर्त्यांना पेमेंटचा एक सुलभ मार्ग प्रदान करतो. या सहयोगाद्वारे फ्लिपकार्ट, अॅक्सिस बँक आणि पेयू डिवाईस-बाउंड बायोमेट्रिक कार्ड ऑथेंटिकेशनचे एक भक्कम मॉडेल प्रस्थापित करत आहेत, जे भारतातील नेक्स्ट-जेन सुरक्षित डिजिटल व्यवहारांना पाठबळ देऊ शकेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande