
* १४ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत; प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत ५ जून रोजी
मुंबई, 01 मे (हिं.स.) : म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीर संगणकीय सोडत प्रणालीमधील विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १२२१ सदनिकांच्या किंमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली आहे.
मुंबई मंडळातर्फे ३० मार्च, २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या सोडतीमध्ये संकेत क्रमांक ५३८, बिल्डींग नं. २ अ,ब पॉकेट- २, कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई, ४८० सदनिकांची विक्री किमंत रु.१,४५,५८,३०७ /- ते रु.१, ४७, ९७, ९९२ /- व संकेत क्रमांक – ५३९ बिल्डींग नं. ३ अ,ब,क पॉकेट क्र. २ कन्नमवार नगर, विक्रोळी, येथील ७४१ सदनिकांची विक्री किमंत रु. १,४५,७४,९४२ /- ते रु. १,४८,१४,९०१/- अशी नमूद करण्यात आली आहे.
या संकेत क्रमांकातील सदनिकांची विक्री किमंत प्रती सदनिका ७.५ टक्क्यांनी कमी करण्यात येत असून सुधारित किंमती पुढीलप्रमाणे आहेत: संकेत क्र.५३८, बिल्डींग नं. २ अ,ब पॉकेट- २, कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई, ४८० सदनिकांची विक्री किमंत रु. १,३४,६६,४३४/- ते रु. १,३६,८८ १४३/- व संकेत क्रमांक ५३९ - बिल्डींग नं. ३ अ,ब,क पॉकेट क्र. २ कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई येथील ७४१ सदनिकांची विक्री किमंत रु.१,३४,८१ ८२१/- ते रु. १,३७,०३,७८३/- अशी सुधारीत करण्यात येत आहे.
सदर प्रकल्पातील सदनिकांना प्रती सदनिका ०१ वाहन तळ (पार्कीग) विना मुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी या संधीचा अर्जदारांनी सोडतीसाठी अर्ज दाखल करुन लाभ घेण्यात यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.
म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला ३० मार्च रोजी सुरुवात करण्यात आली होती व अधिकाधिक नागरिकांना सोडत प्रक्रीयेत सहभाग घेता यावा याकरिता मंडळातर्फे १४ मे पर्यंत मुदत वाढ जाहीर करण्यात आली आहे .
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी