महाराष्ट्र दिनी उपक्रम : दत्तक घेतलेल्या क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप !
- कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांचे अनोखे सामाजिक कार्य डोंबिवली, 01 मे (हिं.स.)। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या क्षयरुग्ण मुक्त देश या संकल्पनेला साजेसे कार्य कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केले. कल
Photo1


- कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांचे अनोखे सामाजिक कार्य

डोंबिवली, 01 मे (हिं.स.)।

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या क्षयरुग्ण मुक्त देश या संकल्पनेला साजेसे कार्य कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केले. कल्याण ग्रामीण मतदार संघातील सुमारे ८६ क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना यातून पूर्णपणे बरे करण्याचा वसा घेतला आहे. महाराष्ट दिनाचे औचित्य साधून उपस्थित क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यात आला. यापूर्वी महाराष्ट्र दिनी निळजे आरोग्य केंद्रात ध्वजवंदन केले.

कल्याण ग्रामीण विभागातील निळजे येथील आरोग्य केंद्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुष्मिता कैमल, आरोग्य निरीक्षक कैलास घरत, नितीन चौधरी, अजय माने, प्रथमेश बारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार मोरे यांनी या कार्यक्रमअंतर्गत गंभीर रुग्णांना सामाजिक व आर्थिक आधार देण्याचे काम केले. निळजे व आसपासच्या परिसरातील क्षयरुग्णांना आर्थिक आणि मानसिक पाठबळ देणे, जेणेकरून उपचारांचा खर्च भागवणे शक्य होणार आहे.

यावेळी आमदार मोरे म्हणाले, निळजे येथील आरोग्य केंद्रात १०० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून याविषयीची फाईल त्यांच्या टेबलवर आहे. येत्या अधिवेशनात हा विषय पटलावर आणून लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय व्हावे असे निश्चित केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ सेवा मिळेल. सध्या निळजे येथील आरोग्य केंद्रात अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना डोंबिवली किंवा कल्याणमध्ये जावे लागत आहे.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande