नवी जनरल इन्शुरन्सकडून मोटर इन्शुरन्स अधिक सक्षम; 'कॅशलेस एव्हरीव्हेअर' सुविधा सादर
मुंबई, 12 मे (हिं.स.)। भारतांतील वेगाने वाढणाऱ्या डिजिटल आर्थिक सेवांपैकी एक असलेल्या ''नवी''ची विमा शाखा, नवी जनरल इन्शुरन्सने आज GoMechanic, ReadyAssist, myTVS आणि AIS Windshield Experts सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीमुळे
Navi General Insurance Strengthens Motor Insurance Offering


मुंबई, 12 मे (हिं.स.)। भारतांतील वेगाने वाढणाऱ्या डिजिटल आर्थिक सेवांपैकी एक असलेल्या 'नवी'ची विमा शाखा, नवी जनरल इन्शुरन्सने आज GoMechanic, ReadyAssist, myTVS आणि AIS Windshield Experts सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीमुळे देशभरातील ग्राहकांना 'कॅशलेस एव्हरीव्हेअर' (कुठेही कॅशलेस) मोटर इन्शुरन्स क्लेमचा अनुभव मिळणार आहे.

या भागीदारीमध्ये 'नवी'च्या डिजिटल-फर्स्ट क्लेम प्रक्रियेला ऑन-ग्राउंड सेवा क्षमतेची जोड देण्यात आली आहे. यामुळे ग्राहक देशातील कोणत्याही भागीदार गॅरेजमध्ये जाऊन आपल्या खिशातील पैसे खर्च न करता वाहन दुरुस्त करून घेऊ शकतात. जिथे प्रत्यक्ष मदतीची आवश्यकता असेल, तिथे नवीचे ऑन-ग्राउंड भागीदार क्लेमची सूचना मिळाल्यानंतर काही तासांतच ग्राहकांपर्यंत पोहोचतील; मग ते रस्त्यावरील ब्रेकडाउन असो, जागीच वाहन सर्वेक्षण (survey) असो किंवा भागीदार गॅरेजमध्ये वाहन सेवा मिळवणे असो.

भागीदारीची प्रमुख वैशिष्ट्ये:

ReadyAssist: १९,००० हून अधिक पिनकोडवर २४x७ रोडसाइड असिस्टन्स प्रदान करेल आणि संपूर्ण भारतात नवीच्या प्रत्यक्ष क्लेम सर्वेक्षणाच्या गरजा पूर्ण करेल. यामुळे नवीचा अधिकृत प्रतिनिधी क्लेमची सूचना मिळाल्यानंतर काही तासांत ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल. GoMechanic, myTVS आणि AIS Windshield Experts: भागीदार गॅरेजेस आणि विंडशील्ड सेवा केंद्रांच्या विस्तीर्ण नेटवर्कमध्ये प्रवेश देतील. यामुळे 'ओन-डॅमेज' (स्वतःच्या नुकसानीची) दुरुस्ती आणि विंडशील्ड बदलण्यापर्यंत सर्व क्लेम कॅशलेस पद्धतीने पूर्ण होतील.

नवीने आपल्या कॅशलेस गॅरेज नेटवर्कचाही वेगाने विस्तार केला आहे. जानेवारी २०२६ मधील अंदाजे ७१० गॅरेजेसवरून हे नेटवर्क आज ५०० हून अधिक शहरांमध्ये १,६०० पेक्षा जास्त झाले असून, जून २०२६ पर्यंत ३,००० पेक्षा जास्त गॅरेजेसचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आमचे उद्दिष्ट तीन तत्त्वांवर आधारित सर्वोत्तम मोटर क्लेम अनुभव तयार करणे आहे - कुठेही कॅशलेस सुविधा, जिथे गरज असेल तिथे काही तासांत प्रत्यक्ष उपस्थिती आणि वेग. तंत्रज्ञान अडथळे दूर करते, परंतु मजबूत ऑन-ग्राउंड भागीदारीमुळे ग्राहकांना कठीण प्रसंगी खरोखर आधार मिळतो, असे नवी जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ वैभव गोयल यांनी सांगितले.

भारतातील एकूण जनरल इन्शुरन्स प्रीमियममध्ये मोटर इन्शुरन्सचा वाटा सुमारे ३२% आहे आणि आता कल डिजिटल मॉडेल्सकडे झुकत आहे. ग्राहक आता क्लेमचा अनुभव आणि सेवा नेटवर्कच्या व्याप्तीला अधिक महत्त्व देत आहेत. ReadyAssist चे संस्थापक आणि सीईओ विमल सिंग एस. व्ही. म्हणाले, आमच्या १९,०००+ पिनकोडवरील उपस्थितीसह, आम्ही नवीच्या डिजिटल क्लेम प्रवासाला पूरक साथ देऊ. रस्त्यावरील ब्रेकडाउन असो किंवा ऑन-स्पॉट वाहन सर्वेक्षण, आम्ही प्रत्येक पॉलिसीधारकाला वेळेवर आणि विश्वासार्ह प्रत्यक्ष मदत सुनिश्चित करू.

या भागीदारीसह, 'नवी' डिजिटल सुलभता आणि प्रत्यक्ष सेवा क्षमता यांची सांगड घालून एक व्यापक मोटर इन्शुरन्स इकोसिस्टम तयार करत आहे. मोटर इन्शुरन्स आता संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी थेट उपलब्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande