लातूरमध्ये मातंग समाजासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन
लातूर, 14 मे (हिं.स.) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, लातूर जिल्हा कार्यालय, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मातंग समाजातील 12 पोटजातीतील बांधवांसाठी एक दिवसीय जिल
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे


लातूर, 14 मे (हिं.स.) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, लातूर जिल्हा कार्यालय, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मातंग समाजातील 12 पोटजातीतील बांधवांसाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा 19 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरातील शासकीय मुलांचे वसतिगृह अभ्यासिका हॉल येथे आयोजित केली जाणार आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील मातंग समाजाच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, या उद्देशाने ही विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक आणि सामूहिक लाभ योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तसेच महामंडळामार्फत उपलब्ध असलेली कर्ज योजना, शैक्षणिक सवलती आणि रोजगाराच्या संधींबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

मातंग समाजातील युवक-युवती तसेच गरजू लाभार्थ्यांनी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande