व्यापाऱ्यांच्या समस्या लवकरच सोडवणार — आ. अमित देशमुख
- लातूर औद्योगिक वसाहतीसाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश लातूर, 14 मे (हिं.स.) : लातूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्था (उद्योग भवन) ही वसाहत म्हणजे मुंबईतील बीकेसीप्रमाणे लातूरचे व्यापारी केंद्र असून येथील व्यापारी महापालिकेला कर भरून शहराच्य
अमित देशमुख


- लातूर औद्योगिक वसाहतीसाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश

लातूर, 14 मे (हिं.स.) : लातूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्था (उद्योग भवन) ही वसाहत म्हणजे मुंबईतील बीकेसीप्रमाणे लातूरचे व्यापारी केंद्र असून येथील व्यापारी महापालिकेला कर भरून शहराच्या उत्पन्नात मोठे योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांना संरक्षण आणि आवश्यक सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज येथे केले.

लातूर शहरातील उद्योग भवन येथे असलेल्या लातूर अर्बन को-ऑप. बँकेच्या सभागृहात लातूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्था मर्यादित, लातूर (उद्योग भवन) येथील व्यापाऱ्यांच्या राज्य शासन व महापालिका स्तरावरील विविध विषयांवरील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार देशमुख प्रमुख उपस्थित होते.

यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, गटनेते विजयकुमार साबदे, आयुक्त मानसी मीना, संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी, चेअरमन अशोक लोया, उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी आमदार अमित देशमुख यांनी लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या लवकरच सोडवण्याची ग्वाही दिली. “महानगरपालिकेने या वसाहतीतील रस्ते, नाले आणि पथदिव्यांच्या विकासासाठी तातडीने ‘मास्टर प्लॅन’ तयार करावा. लेआउट, गुंठेवारी आणि प्रॉपर्टी ओनर परवानगी यांसारखी कामे तात्काळ पूर्ण करावीत,” असे निर्देश त्यांनी दिले.

राज्यातील अशा 53 वसाहतींसाठी सरकार धोरण तयार करत असून लातूरमधील 28 एकर जमिनीचा प्रश्न आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी लवकरच मार्गी लावल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

लातूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी यांनी प्रास्ताविकात विविध प्रशासकीय व तांत्रिक अडचणींची सविस्तर माहिती सादर केली

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande