बांगलादेशात गोवरचा कहर, मृतांचा आकडा ४३२ वर, रुग्णांची संख्या ६०,००० च्या पार
ढाका, 14 मे (हिं.स.)। बांगलादेश मध्ये गोवरच्या साथीने गंभीर स्वरूप धारण केले असून, या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ४३२ वर पोहोचली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, गेल्या २४ तासांत आणखी किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात गोवरच्य
बांगलादेशमध्ये गोवरचा कहर, मृतांचा आकडा ४३२ वर, रुग्णांची संख्या ६०,००० च्या पार


ढाका, 14 मे (हिं.स.)। बांगलादेश मध्ये गोवरच्या साथीने गंभीर स्वरूप धारण केले असून, या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ४३२ वर पोहोचली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, गेल्या २४ तासांत आणखी किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात गोवरच्या पुष्टी झालेल्या आणि संशयित रुग्णांची एकूण संख्या ६० हजारांहून अधिक झाली असून, आरोग्य तज्ज्ञांनी याला अलीकडच्या वर्षांतील सर्वात मोठा उद्रेक म्हटले आहे.

आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या (डीजीएचएस) माहितीनुसार, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत या मृत्यूंची नोंद करण्यात आली. याच कालावधीत १,४८९ संशयित रुग्ण आढळले असून, संशयित संसर्गितांची एकूण संख्या ५३,०५६ झाली आहे. याशिवाय, १२६ पुष्टी झालेली प्रकरणे समोर आली असून, एकूण पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या ७,१५० वर पोहोचली आहे.

जनआरोग्य तज्ज्ञ मुश्ताक हुसेन यांनी सांगितले की, वेळेवर लसीकरण न झाल्यामुळे गोवरचे रुग्ण वेगाने वाढले आहेत. त्यांनी म्हटले की, “उद्रेक लक्षात घेऊन योग्य उपाययोजना वेळेत करण्यात आल्या असत्या, तर मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी झाला असता.” ते पुढे म्हणाले की, एकदा रुग्णसंख्या ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करणे आवश्यक होते; मात्र तसे न करणे ही मोठी चूक ठरली आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षी अपुरे लसीकरण आणि कुपोषण यामुळे या साथीची तीव्रता वाढली. विषाणूतज्ज्ञ आणि जनआरोग्य तज्ज्ञ महबूबा जमील यांनी यावर्षी गोवरच्या रुग्णांमध्ये झालेल्या असामान्य वाढीबाबत चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “लसीकरण मोहीम सातत्याने सुरू राहिल्यास पुढील काही आठवड्यांत संसर्ग कमी होण्यास सुरुवात होऊ शकते. ज्या भागांत लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे, तिथे परिस्थिती तुलनेने चांगली दिसत आहे.”जमील यांनी सांगितले की, संसर्गाच्या दृष्टीने सिलहट जिल्हा हा सध्या सर्वाधिक प्रभावित भागांपैकी एक आहे.

बुधवारी ‘सचेतन नागरिक समाज’च्या बॅनरखाली आंदोलकांच्या एका गटाने ढाकामधील धनमंडी २७ परिसरात मानवी साखळी आंदोलन केले. त्यांनी गोवरमुळे झालेल्या मृत्यूंसाठी माजी हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस आणि त्यांचे आरोग्य सल्लागार नूरजहां बेगम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आंदोलकांनी पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचीही मागणी केली.

अहवालात म्हटले आहे की, देशातील गोवर लसीकरणाचे प्रमाण सलग दोन दशकांपासून वाढत होते आणि ते कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय आदर्श मानले जात होते.मात्र, मागील हंगामी सरकारच्या धक्कादायक निष्काळजीपणामुळे हा विक्रम उद्ध्वस्त झाला आहे. या निष्काळजीपणामुळे हजारो लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, वेळेत योग्य पावले उचलली असती तर ही शोकांतिका टाळता आली असती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande