अमेरिकेत भारतीय वंशाच्या युवकाला शस्त्रांची तस्करीप्रकरणी ६४ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
वॉशिंग्टन, 15 मे (हिं.स.)। अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भारतीय वंशाच्या जशनप्रीत सिंह याला शस्त्रांची तस्करी आणि मशीनगन बाळगल्याच्या आरोपावरून ६४ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पंजाबमधील २७ वर्षीय जशनप्रीत सिंह याला पूर्ण पाच वर
America Indian Youth Sentence


वॉशिंग्टन, 15 मे (हिं.स.)। अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भारतीय वंशाच्या जशनप्रीत सिंह याला शस्त्रांची तस्करी आणि मशीनगन बाळगल्याच्या आरोपावरून ६४ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पंजाबमधील २७ वर्षीय जशनप्रीत सिंह याला पूर्ण पाच वर्षे आणि चार महिने संघीय कारागृहात काढावे लागणार आहेत. ही माहिती अमेरिकन अटर्नी एरिक ग्रँट यांनी दिली. युनायटेड स्टेट्स अटर्नी ऑफिस, ईस्टर्न डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्निया यांच्या वेबसाइटवर जशनप्रीतला सुनावण्यात आलेली शिक्षा आणि त्याच्या गुन्ह्याचा तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, जशनप्रीत हा ‘पंजाबी डेव्हिल्स’ या मोटरसायकल क्लबचा संस्थापक आहे. ‘पंजाबी डेव्हिल्स’ हा प्रत्यक्षात शस्त्रांच्या तस्करीत आणि ‘हेल्स एंजेल्स’शी संबंधित एक गुन्हेगारी टोळी असल्याचे सांगितले जात आहे. ६ जून २०२५ रोजी जशनप्रीतने एका गुप्त पोलिस अधिकाऱ्याला शस्त्रे विकण्याचा प्रयत्न केला. या शस्त्रांमध्ये असॉल्ट वेपन, रिव्हॉल्वर आणि मशीनगन यांचा समावेश होता. त्यानंतर त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. झडतीदरम्यान आणखी शस्त्रे सापडली. त्यामध्ये मशीनगन, मशीनगन कन्वर्जन डिव्हाइस आणि एक सायलेंसरचा समावेश होता. अधिकाऱ्यांना पाइनॅपल-शैलीचा हँड ग्रेनेड आणि फ्यूज केलेला ग्रेनेडही आढळला. सॅन जोएकिन काउंटी शेरीफ विभागाच्या बॉम्ब पथकाने घटनास्थळीच हे स्फोटक निष्प्रभ केले.

यानंतर त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला. त्याच्या सुनावणीची तारीख २१ जुलै २०२५ अशी निश्चित करण्यात आली होती; मात्र तो त्या दिवशी हजर राहिला नाही. त्यामुळे न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. अटकेपासून वाचण्यासाठी तो भूमिगत झाला आणि २६ जुलै रोजी भारतात पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडला गेला. या प्रकरणात सहाय्यक यूएस अटर्नी एड्रियन टी. किन्सेला यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande