अमेरिका-चीन संबंध जगातील सर्वात महत्त्वाचे - ट्रम्प
बीजिंग, 14 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन दौऱ्यादरम्यान अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंधांना जागतिक इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या संबंधांपैकी एक असे संबोधले. त्यांनी म्हटले की, दोन्ही देशांतील जनतेमध्ये परस्पर आदर आण
अमेरिका-चीन संबंध जगातील सर्वात महत्त्वाचे- ट्रम्प


बीजिंग, 14 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन दौऱ्यादरम्यान अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंधांना जागतिक इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या संबंधांपैकी एक असे संबोधले. त्यांनी म्हटले की, दोन्ही देशांतील जनतेमध्ये परस्पर आदर आणि सहकार्याची भावना अमेरिकेच्या स्थापनेपासूनच अस्तित्वात आहे.

बीजिंगमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका आणि चीनच्या नागरिकांमध्ये सुरुवातीपासूनच परस्पर सन्मानाचे दृढ नाते राहिले आहे. अमेरिकेच्या संस्थापक नेत्यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, बेंजामिन फ्रँकलिन यांनी आपल्या वसाहतीकालीन वृत्तपत्रात चिनी तत्त्वज्ञ कन्फ्यूशियस यांचे विचार प्रकाशित केले होते. तसेच आजही अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीवर प्राचीन चिनी विद्वानांच्या मूर्ती अभिमानाने उभ्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी घोषणा केली की, त्यांचे चिनी समकक्ष शी जिनपिंग हे आगामी २४ सप्टेंबर रोजी व्हाइट हाऊसला भेट देणार आहेत. एका बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी ही परस्पर अधिकृत भेट असल्याचे सांगितले.आपल्या भाषणात त्यांनी शी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नी पेंग लियुआन यांना अमेरिकेला येण्याचे निमंत्रण देत, सप्टेंबरमध्ये व्हाइट हाऊसमध्ये त्यांचे स्वागत करण्यास आपण उत्सुक असल्याचे म्हटले. ट्रम्प यांनी अमेरिका-चीन संबंधांना “दीर्घकालीन आणि सखोल” संबोधत, दोन्ही देशांतील जनतेमधील संबंध अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी ही बैठक विशेष आणि सकारात्मक अनुभव असल्याचेही नमूद केले.

एका चिनी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी जागतिक ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवणे आवश्यक असल्याचे मान्य केले. अमेरिका आणि इस्रायलच्या इराणविरोधी युद्धामुळे हा महत्त्वाचा सागरी मार्ग बराच काळ बंद आहे. शी जिनपिंग यांनी या मार्गातून जाणाऱ्या जहाजांवर कोणताही कर किंवा टोल लावण्यास विरोध दर्शवला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, चीनने अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली असून, भविष्यात आखाती देशांवरील तेल अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.

बैठकीत फेंटानिलसारख्या अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा पुरवठा रोखण्याबाबतही चर्चा झाली. तसेच अमेरिकेकडून कृषी उत्पादनांची खरेदी वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ही माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर माहिती दिली.

मात्र, शी जिनपिंग यांनी स्पष्ट केले की, चीन या जलमार्गाच्या कोणत्याही प्रकारच्या लष्करीकरणाला किंवा त्यावर शुल्क आकारण्याच्या प्रयत्नांना विरोध करतो. तसेच भविष्यातील ऊर्जा गरजांसाठी अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करण्याबाबत चीन विचार करू शकतो, असेही त्यांनी संकेत दिले.

आपल्या भाषणात ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेचे चीनशी असलेले संबंध देशाच्या स्थापनेपासून जोडले गेले आहेत. त्यांनी सांगितले की, १७८४ मध्ये अमेरिकेचे पहिले वाणिज्यदूत सॅम्युअल शॉ हे चीनमध्ये पोहोचले होते, तेव्हा पहिले अमेरिकन व्यापारी जहाज तेथे आले होते. ट्रम्प म्हणाले की, त्या काळापासून आजपर्यंत हे संबंध अधिक मजबूत झाले असून, ते जागतिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली संबंधांपैकी एक बनले आहेत.

बीजिंगमध्ये झालेल्या बैठकींचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले की, अमेरिकी आणि चिनी प्रतिनिधीमंडळांमधील चर्चा अत्यंत सकारात्मक आणि फलदायी ठरली. ते म्हणाले, “आजची चर्चा अत्यंत उपयुक्त आणि चांगल्या वातावरणात झाली. हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे आणि भविष्यातही असे संवाद सुरू राहिले पाहिजेत.” ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, ही भेट दोन्ही देशांतील मैत्री आणि सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची संधी आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, तैवानचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने हाताळल्यास दोन्ही देशांमध्ये गंभीर संघर्ष आणि अगदी लष्करी चकमकीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था व्यापार, ऊर्जा सुरक्षा, इराण युद्ध आणि जागतिक धोरणात्मक संतुलन यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा करत असताना हे विधान समोर आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande