समृद्धी महामार्गावर संशयित तेलुगू युवक ताब्यात; २.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती, 16 मे (हिं.स.) : समृद्धी महामार्गावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या दुचाकीस्वाराचा पोलिसांनी पाठलाग करून एका तेलुगू युवकाला ताब्यात घेत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल २ लाख २४ हजार ५६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये र
समृद्धी महामार्गावर संशयित तेलुगू युवक ताब्यात; २.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त


समृद्धी महामार्गावर संशयित तेलुगू युवक ताब्यात; २.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त


अमरावती, 16 मे (हिं.स.) : समृद्धी महामार्गावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या दुचाकीस्वाराचा पोलिसांनी पाठलाग करून एका तेलुगू युवकाला ताब्यात घेत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल २ लाख २४ हजार ५६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल, बनावट नंबर प्लेट, लोखंडी हत्यारे आणि दुचाकीचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयसी-६ नवीन धामणगाव परिसरातील समृद्धी महामार्गावर पोलीस पथक ड्युटीवर असताना टोल मॅनेजर सुरेंद्र बनकर यांनी मोबाईलद्वारे माहिती दिली की, दुचाकीवरील दोन इसम भरधाव वेगाने नागपूर कॉरिडॉरच्या दिशेने पळून गेले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला.

नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ९१ जवळील वर्धा नदी पुलाजवळ संशयित दुचाकी अडवण्यात आली. मात्र, मागे बसलेला इसम घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. चालकही पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या युवकाने आपले नाव इमानेल मेकला (वय २७, रा. पिटरागोंडा, जि. नेल्लोर, आंध्रप्रदेश) असे सांगितले. पोलिसांनी त्याची व त्याच्या बॅगेची झडती घेतली असता ₹१ लाख ५४ हजार ५६२ रोख रक्कम, विविध वाहनांच्या १६ बनावट नंबर प्लेट, तीन मोबाईल, लोखंडी हत्यारे, दोन गुलेल, आधार कार्ड, रेल्वे तिकिटे आणि अंदाजे ₹७० हजार किंमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी असा एकूण ₹२ लाख २४ हजार ५६२ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संशयित युवक तेलुगू भाषिक असल्याने चौकशीदरम्यान समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. तसेच त्याच्यासोबत फरार झालेल्या दुसऱ्या इसमाबाबतही तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे जप्त केलेला मुद्देमाल चोरीचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ही कारवाई प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जमनादास सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर गावंडे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास मंगरुळ दस्तगीर पोलीस करीत आहेत.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande