
गॉथेनबर्ग, 18 मे (हिं.स.) - सध्याच्या तणावपूर्ण जागतिक वातावरणात भारत आणि स्वीडनसारख्या लोकशाही देशांमध्ये जवळचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. भारत आणि स्वीडन यावर सहमत आहेत की दहशतवाद संपूर्ण मानवजातीसाठी गंभीर धोका आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला मिळालेल्या समर्थनाबद्दल आम्ही स्वीडनचे पंतप्रधान क्रिस्टर्सन यांचे आभारी आहोत. आम्ही दहशतवाद आणि त्याचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध आमचा लढा सुरू ठेवू, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. स्वीडन दौऱ्यादरम्यान गोथेनबर्गमध्ये 'युरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री'ला संबोधित करताना त्यांनी दहशतवादावर चिंता व्यक्त केली.
मोदी म्हणाले की, भारत-स्वीडन संबंध आता सामरिक भागीदारीत वाढ होत आहे. दोन्ही देशांमधील वाढते सहकार्य लक्षात घेता, संबंधांना सामरिक भागीदारीपर्यंत नेण्यात आले आहे. या अंतर्गत हरित संक्रमण, सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि लोकांमधील संपर्क वाढवण्यावर काम केले जाईल. स्वीडिश कंपन्यांनी भारतात उत्पादन युनिट्स स्थापन करणे हे दर्शवते की, संबंध आता केवळ संरक्षण करारांपुरते मर्यादित नाहीत. दोन्ही देश दीर्घकालीन औद्योगिक भागीदारीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. एआय, हेल्थ टेक आणि ग्रीन मोबिलिटीमध्ये दोन्ही देशांमध्ये मोठ्या संधी आहेत. याला पुढे नेण्यासाठी स्वीडन-इंडिया तंत्रज्ञान आणि एआय कॉरिडॉरवर काम केले जाईल.
दोन्ही देशांनी स्टार्टअप आणि रिसर्च इकोसिस्टमला थेट जोडण्यासाठी इंडिया-स्वीडन सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवनवीन शोध आणि तंत्रज्ञान भागीदारीला गती मिळेल. भारत ग्रीन हायड्रोजन, सर्क्युलर इकॉनॉमी आणि सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. स्वीडनचे तंत्रज्ञान आणि भारताची क्षमता एकत्र करून जगासाठी क्लायमेट सोल्युशन्स तयार करता येतील. भारत-EU FTA लागू झाल्यानंतर उद्योग, गुंतवणूकदार आणि इनोव्हेटर्ससाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.
भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टम आहे. भारतीय स्टार्टअप्स एआय, फिनटेक, स्पेस, ड्रोन, बायोटेक आणि क्लायमेट टेकमध्ये जागतिक उपाययोजना तयार करत आहेत. आता ‘इराद्यातून’ ‘गुंतवणुकीकडे’ वाटचाल करण्याची वेळ आहे, असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी