नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात 'बुद्ध पौर्णिमे'निमित्त प्राणी गणना संपन्न
नाशिक, 02 मे (हिं.स.)। - महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आणि पक्षीप्रेमींचे नंदनवन असलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात १ मे २०२६ रोजी बुद्ध पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर ''निसर्ग अनुभव'' अर्थात प्राणी गणना उपवनसंरक्षक कृष्णा भवर आणि सह
Animal census on the


Animal census on the


नाशिक, 02 मे (हिं.स.)।

- महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आणि पक्षीप्रेमींचे नंदनवन असलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात १ मे २०२६ रोजी बुद्ध पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर 'निसर्ग अनुभव' अर्थात प्राणी गणना उपवनसंरक्षक कृष्णा भवर आणि सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांचे मार्गदर्शनात पार पडली. या गणनेमध्ये विविध वन्यजीवांचे दर्शन झाल्याने विद्यार्थी, निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सदर गणेकरिता सर्व सहभागी निसर्गप्रेमींना विनामूल्य प्रवेश देण्यात आला होता.

प्राणी गणनेचा तपशील:

ही प्राणी गणना १ मे रोजी सायंकाळी ५:०० वाजता सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी २ मे रोजी सकाळी ७:०० वाजेपर्यंत अखंडितपणे सुरू होती. पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात मचाणांवर बसून वन्यजीवांच्या हालचालींची नोंद घेण्यात आली.

आढळून आलेले प्राणी:

या मोहिमेदरम्यान एकूण १५ वन्यजीवांची नोंद करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खालील प्राण्यांचे दर्शन झाले:

सोनेरी कोल्हा: ०८

रान मांजर: ०३

तरस: ०१

मुंगूस: ०१

रान ससे: -०२

सहभागी अधिकारी व निसर्गप्रेमी

वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, वनमजूर, गाईड आणि निसर्गप्रेमी पर्यटकांनी या गणनेत सक्रिय सहभाग नोंदवला. यामध्ये प्रामुख्याने:

अधिकारी: श्री. हिरालाल चौधरी (वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य), श्री. गौरव रायते (परीक्षविधीन वनपरिक्षेत्र अधिकारी, ).

वन कर्मचारी: श्री. कैलास सदगीर, श्री. गोरख पाटील,

निसर्गप्रेमी व स्वयंसेवक: श्री अंनत सरोदे, अझहर शेख, रेहान शेख, सारंग नाईक, गणेश ठाकूर, सीमा तंगडपल्लीवार, स्पंदन खैरनार, पद्मजा ओतुरकर, डॉ. कपिल वाघ, अमेय पुरोहित, हर्षल आहेरराव, सर्वेश शिंदे, दिपक कुटे, गंगाधर आधाव, एकनाथ साळवे, संजीव गायकवाड, सुनील जाधव, रोहित मोगल, रोशन पोटे, पंकज चव्हाण आणि अजित कुटे.

वन्यजीव संवर्धन आणि अभयारण्यातील जैवविविधतेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने ही प्राणी गणना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. निसर्गाच्या या सानिध्यात वन्यजीवांच्या अधिवासाची माहिती संकलित करण्यासाठी या मोहिमेला यश आले आहे, तसेच वने व वन्यजीवबाबत सर्वसामान्यंमध्ये जनजागृती व्हावी व वन्यजीवांना जवळून बघता यावे हा या मोहिमेचा उद्देश आहे असे हिरालाल चौधरी यांनी सांगितले .

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande