
नाशिक, 02 मे, (हिं.स.)। महाराष्ट्राच्या अस्मितेचे दैवत आणि हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपमानास्पद व इतिहास गृही वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री व स्वामी आनंद स्वरूप यांच्या विरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी सकल मराठा समाजाच्या विविध संघटनांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची उभारणी करताना बलाढ्य सत्तांना पराभूत केले आणि सर्वसमावेशक न्याय व लोककल्याणकारी राज्यव्यवस्था उभी केली. त्यांनी कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव न करता हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अशा महान कार्याचा विपर्यास करून चुकीचा इतिहास समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न हा गंभीर स्वरूपाचा असून तो भावी पिढ्यांसाठी धोकादायक आहे.
सदर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची तीव्र लाट उसळली असून संबंधितांवर कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.
यावेळी सदर तक्रार देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर साहेब संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाघ छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर, राजेंद्र शेळके, वैभव वडजे, रमेश खापरे ,एडवोकेट गौरव गाजरे, संदीप हांडगे ,सागर कातड हिरामण वाघ, विशाल वारुळे, हार्दिक निगल महेंद्र बेहेरे गणेश पाटील प्रमिला पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV