रायगड पोलीस दलातील महेश धनवी यांचा विशेष सन्मान
रायगड, 02 मे, (हिं.स.) : रायगड पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल महेश धनवी यांच्या पोलिस दलातील उल्लेखनीय आणि विशेष कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या वतीने विशेष सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या गौरवाबद्दल अलिबाग येथे आयोजित कार
Special honor to Mahesh Dhanvi of Raigad Police Force


रायगड, 02 मे, (हिं.स.) : रायगड पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल महेश धनवी यांच्या पोलिस दलातील उल्लेखनीय आणि विशेष कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या वतीने विशेष सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या गौरवाबद्दल अलिबाग येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

महेश धनवी हे सध्या खोपोली पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असून त्यांनी सेवाकाळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल वरिष्ठ स्तरावर घेण्यात आली आहे. पोलिस दलातील कर्तव्यदक्षता, जनतेशी असलेला समन्वय आणि विविध प्रकरणांमध्ये बजावलेली जबाबदारी यामुळे त्यांना हा सन्मान मिळाल्याचे बोलले जात आहे.

सत्कार सोहळ्यात विविध मान्यवर, पोलीस अधिकारी तसेच सहकाऱ्यांनी धनवी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. महेश धनवी यांच्या या विशेष सन्मानाबद्दल खोपोली परिसरासह रायगड जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून, सामाजिक वर्तुळातूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande