परभणी - रविवारपासून सेलूतील कामील अवलिया दर्गाहच्या उर्स सोहळ्यास होणार प्रारंभ
परभणी, 2 मे, (हिं.स.)। सेलू शहरातील कामील अवलिया दर्गाह हजरत सय्यद शहाबूद्दीन व हजरत सय्यद बुरहानोद्दीन यांच्या उर्स सोहळ्यास रविवार 3 मेपासून प्रारंभ होत आहे. या उर्स निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांम
परभणी - रविवारपासून सेलूतील कामील अवलिया दर्गाहच्या उर्स सोहळ्यास होणार प्रारंभ


परभणी, 2 मे, (हिं.स.)। सेलू शहरातील कामील अवलिया दर्गाह हजरत सय्यद शहाबूद्दीन व हजरत सय्यद बुरहानोद्दीन यांच्या उर्स सोहळ्यास रविवार 3 मेपासून प्रारंभ होत आहे. या उर्स निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

3 मे रोजी असर नमाजानंतर सायंकाळी साडे पाच वाजता दर्ग्यावर गुस्ल (स्नान) करण्यात येणार आहे. 4 मे रोजी जोहर नमाजानंतर दुपारी 3 वाजता दर्गाह परिसरातून भव्य संदल मिरवणूक काढण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी राहणार आहेत. यावेळी तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक वाघमारे तसेच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

5 मे रोजी रात्री 9 वाजता दर्ग्यात प्रसिद्ध कव्वाल यांचा शानदार कव्वाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच 6 मे रोजी फजर नमाजानंतर सकाळी 6 वाजता तकसीम तबरुख (गोड जेवण) कार्यक्रम होणार असल्याची माहिती दर्गाहचे मुतवल्ली सय्यद कबीर भाई नानू यांनी दिली.

उर्स निमित्त आयोजित सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उर्स कमिटीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पठाण उरुज अली खान (उरूज लाला), उपाध्यक्ष इकबाल सेठ मोदी, पत्रकार शेख आरेफ भाई, अबरार बेग, नासेर खान, जिकर सेठ, शेख गफार झारेकरी, सय्यद जुबेर, अशफाक बकाली, शेख युनूस झारेकरी, सय्यद खदीर, पठाण इरफान खान आदींच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande