भारतीय बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा मलेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत
क्वालालंपूर, 21 मे (हिं.स.)मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अश्मिता चालिहाने प्रवेश केला. तर भारताचे उर्वरित बॅडमिंटनपटूंचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. अश्मिता चालिहाने मलेशियाच्या गोह
अश्मिता चालिहा


क्वालालंपूर, 21 मे (हिं.स.)मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अश्मिता चालिहाने प्रवेश केला. तर भारताचे उर्वरित बॅडमिंटनपटूंचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

अश्मिता चालिहाने मलेशियाच्या गोह जिन वेईचा २१-१३, २१-१६ असा पराभव केला. आता तिचा सामना डेन्मार्कच्या आठव्या मानांकित लाईन होजमार्क जार्सफेल्डशी होणार आहे. जार्सफेल्डने जवळपास एक तास चाललेल्या या सामन्यात भारताच्या मालविका बन्सोडचा २१-१६, ८-२१, १५-२१ असा पराभव केला. दुसऱ्या एका महिला एकेरीच्या सामन्यात, थायलंड मास्टर्स चॅम्पियन देविका सिहाग चीनच्या अव्वल मानांकित चेन युफेईकडून २१-१६, २१-१३ अशी पराभूत झाली.

मिश्र दुहेरीमध्ये, सात्विक कनापुरम आणि राधिका शर्मा हे देखील अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि जेनी गे यांच्याकडून १२-२१, २५-२७ ने पराभूत झाले. पुरुष दुहेरीमध्ये, हरिहरन आमसाकरुणन आणि एम.आर. अर्जुन हे चीनच्या हू ची युआन आणि लिन शियांग यांच्याकडून २१-१४, २१-१५ ने पराभूत झाले. लक्ष्य सेन आणि एच.एस. प्रणॉय हे बुधवारी या स्पर्धेतून बाहेर पडले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande