सोलापूर परिसरातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान; शेतकरी चिंतेत
सोलापूर, 25 मे (हिं.स.)। सोलापूर परिसरातील अवकाळी गारपिटीमुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगामी हंगामातील उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गारपिटीमुळे खरड छाटणीनंतर उगवलेले नवीन फु
rain


सोलापूर, 25 मे (हिं.स.)।

सोलापूर परिसरातील अवकाळी गारपिटीमुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगामी हंगामातील उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गारपिटीमुळे खरड छाटणीनंतर उगवलेले नवीन फुटवे, पाने आणि शेंडे तुटून झडल्याने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे.एप्रिल महिन्यात द्राक्षांचा हंगाम संपल्यानंतर बागांची खरड छाटणी करण्यात आली होती. त्यानंतर द्राक्ष वेलीला नवीन फुटवे फुटले होते. हे फुटवे पुढील हंगामातील उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मात्र, अलीकडील गारपिटीमुळे नव्याने फुटलेल्या शेंड्यांसह पाने पूर्णपणे झडून गेली आहेत. त्यामुळे भविष्यात द्राक्षांचे घड लागण्याची शक्यता कमी झाली असून, लागले तरी त्यांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.कुंभारी, वडगाव, दर्गनहळ्ळी, होटगी, होटगी स्टेशन आणि यत्नाळ परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षबागा आहेत. या भागातील बागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande