'कॉकरोच जनता पार्टी'चा मुद्दा इतक्या भावनिकतेने घेऊ नका : सरन्यायाधीश
नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.)भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका याचिकाकर्त्याला ''कॉकरोच जनता पार्टी''चा मुद्दा इतक्या भावनिकतेने घेऊ नका असे सांगितले. एका वकिलाने या प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्
'कॉकरोच जनता पार्टी'


नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.)भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका याचिकाकर्त्याला 'कॉकरोच जनता पार्टी'चा मुद्दा इतक्या भावनिकतेने घेऊ नका असे सांगितले. एका वकिलाने या प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी यासाठी जनहित याचिका दाखल केली होती.

सुनावणीदरम्यान, वकील एन. के. गोस्वामी यांनी सरन्यायाधीशांच्या 'झुरळ' या वक्तव्याचा संदर्भ देत असा युक्तिवाद केला की, सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण देऊनही, न्यायव्यवस्थेला बदनाम करण्यासाठी तथ्ये विकृत करून द्वेषपूर्णपणे सादर केली जात आहेत.

वकिलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, हे इतके भावनिकतेने घेऊ नका. जनहित याचिकेतील लवकर सुनावणीच्या विनंतीवर, सरन्यायाधीशांनी सांगितले की यात कोणतीही गंभीर तातडी नाही आणि सर्वोच्च न्यायालय नियमांनुसार योग्य वेळी यावर सुनावणी घेईल.

या जनहित याचिकेत न्यायालयातील संभाषणांचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करू नये आणि वकिलांच्या बनावट पदव्यांच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, असे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. याच विषयावरील आणखी एका जनहित याचिकेत, सरन्यायाधीशांच्या 'झुरळ' या वक्तव्यानंतर उदयास आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' या व्यंगात्मक ऑनलाइन मोहिमेच्या कारवायांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

'कॉकरोच जनता पार्टी' ही सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी केलेल्या तोंडी वक्तव्यानंतर उदयास आलेली एक व्यंगात्मक सोशल मीडिया मोहीम आहे. सुनावणीदरम्यान, ते म्हणाले होते की, ऑनलाइन सक्रियतेच्या नावाखाली व्यवस्थेवर हल्ला करणारे बेरोजगार तरुण हे 'झुरळांसारखे' आहेत. सरन्यायाधीशांनी नंतर स्पष्ट केले की, त्यांचा संदर्भ बनावट पदव्या असलेल्या लोकांबद्दल होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande