उत्तर प्रदेश : भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, 32 जखमी
उन्नाव, 26 मे (हिं.स.) : उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर औरास परिसरात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. दिल्लीहून बिहारकडे जाणारी एक वेगवान स्लीपर बस चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रणाबाहेर जाऊन डिव्हायडरला धडकली आणि उलटली. या दुर्घटनेत बिहा
उत्तरप्रदेशातील अपघातग्रस्त बसचे छायाचित्र


उन्नाव, 26 मे (हिं.स.) : उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर औरास परिसरात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. दिल्लीहून बिहारकडे जाणारी एक वेगवान स्लीपर बस चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रणाबाहेर जाऊन डिव्हायडरला धडकली आणि उलटली. या दुर्घटनेत बिहारमधील एक पोलिस अधिकारी आणि कैद्यासह एकूण 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 32 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी सुमारे सहाच्या सुमारास घडला. अपघातावेळी बहुतेक प्रवासी गाढ झोपेत होते. बस अचानक पलटी झाल्याने घटनास्थळी एकच आरडाओरडा झाला. डिव्हायडरला धडक दिल्यानंतर काही प्रवासी खिडक्यांमधून बाहेर फेकले जाऊन एक्सप्रेसवेच्या खालील खंदकात पडले. मृतांमध्ये बिहारचे पोलिस अधिकारी रामचंद्र आणि कैदी छत्रपाल यांचा समावेश आहे. दारोगा रामचंद्र हे कैदी छत्रपालला सिवानहून दिल्लीला नेऊन जबाब नोंदवून परत बिहारकडे घेऊन जात होते. अपघाताची माहिती औरास पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी 6 जणांना मृत घोषित केले असून उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या अनेकांना पुढील उपचारासाठी लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेन्द्र लाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिस आणि यूपीडाच्या पथकाने क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande