
रत्नागिरी, 03 मे (हिं.स.) - बारावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. निकालानंतर राज्य मंडळ स्तरावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन सेवा शिक्षण मंडळातर्फे सुरू करण्यात आली आहे.
समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक असे -
९९६०६४४४११, ७९७२५७३७४२, ९८३४०८४५९३, ९३५९९७८३१५, ८१६९२०२२१४, ९३७१६६१२५५, ७२०८४२९३८१, ७७०९१५६०६८, ८४२११५०५२८, ९४०४७८३९९६.
हे समुपदेशक आठ दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. याची विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी, असे कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी