लातूरातून भाजपचा विश्वास बसवराज पाटील मुरूमकरांवर; उमेदवारी जाहीर
लातूर, 31 मे (हिं.स.)। लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते बसवराज पाटील मुरूमकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे तीनही जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांमध्ये उत्
बस्वराज पाटील


लातूर, 31 मे (हिं.स.)।

लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते बसवराज पाटील मुरूमकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे तीनही जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्ष संघटनेत नवचैतन्य संचारले आहे.

बसवराज पाटील मुरूमकर हे दीर्घकाळापासून सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय असून ग्रामीण भागातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जनाधार, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि विकासाभिमुख प्रतिमा यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला असल्याचे बोलले जात आहे.

भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. विविध ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. आगामी निवडणुकीत भाजपची ताकद अधिक वाढवण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.

दरम्यान, बसवराज पाटील मुरूमकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानत “ही उमेदवारी म्हणजे जनतेच्या विश्वासाची पावती आहे. विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मी कायम कटिबद्ध राहीन,” अशी प्रतिक्रिया दिली.

या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांमध्ये मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता असून, सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपकडून बसवराज पाटील मुरूमकर यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीचे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande