सोलापुरात थकीत ऊसबिलांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरू
सोलापूर, 31 मे (हिं.स.)दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकूळ शुगर कारखान्याने थकीत ठेवलेल्या ऊसबिलांच्या मागणीसाठी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंद
sdfg


सोलापूर, 31 मे (हिं.स.)दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकूळ शुगर कारखान्याने थकीत ठेवलेल्या ऊसबिलांच्या मागणीसाठी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला.

आंदोलनाच्या सहाव्या दिवशी खासदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दूरध्वनीद्वारे आंदोलक शेतकऱ्यांशी संपर्क साधत थकीत ऊसबिले मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम विषय समितीचे सभापती सिद्धेश्वर कोरे, पंचायत समिती सदस्य गोविंद डोंगरे, विलास राठोड यांच्यासह अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र ॲम्बुलन्स, डॉक्टर आणि परिचारिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. बिले मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा सल्ला देत नेत्यांनी शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. आंदोलनादरम्यान खुदावाडी येथील शेतकरी प्रभाकर कबाडे आणि वागदरी येथील मोहन धुमाळ यांना चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने त्यांना तत्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे आंदोलनस्थळी चिंता व्यक्त करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. ऊस गाळपासाठी दिल्यानंतरही कारखान्याकडून बिले न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. थकीत रक्कम मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व ॲड. अमोल पाटील, किरणकुमार कापसे, उमेश शिंदे, रावण पवार, जितेंद्र पाटील आदींनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande