
परभणी, 04 मे (हिं.स.)।
भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल व आसाममध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सेलू येथे सोमवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बसस्थानकासमोरील भाजप कार्यालयासमोर फटाके फोडून व घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला.
पश्चिम बंगालमध्ये भाजपला 193 जागांवर विजय मिळाल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या विजयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी जनतेचे आभार मानल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर सेलू ग्रामीण व शहर भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, बूथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, सरपंच तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis