जनगणनेसंदर्भातील सोशल मिडीयावरील अर्ज बनावट आणि अनाधिकृत
परभणी, 04 मे (हिं.स.)। जनगणना 2027 च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत आहे, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली. जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागर
जनगणनेसंदर्भातील सोशल मिडीयावरील अर्ज बनावट आणि अनाधिकृत


परभणी, 04 मे (हिं.स.)।

जनगणना 2027 च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत आहे, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली.

जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी खालील दोन अधिकृत माध्यमांतूनच 33 अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे.

1. स्व नोंदणी - नागरिक https://se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला ‘SE ID’ त्यानंतर येणार्या प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाईल.

2. थेट माहिती देणे - दि. 16.05.26 ते 14.06.26 या कालावधीत आपल्या घरी येणार्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल.

सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणार्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande