शिक्षकांचे अध्यापन हे विद्यार्थीकेंद्रित असणे आवश्यक : उपेंद्र बेल्लुरकर
परभणी, 04 मे (हिं.स.)। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे अध्यापन हे विद्यार्थीकेंद्रित असणे आवश्यक असून बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर
शिक्षकांचे अध्यापन हे विद्यार्थीकेंद्रित असणे आवश्यक : उपेंद्र बेल्लुरकर


परभणी, 04 मे (हिं.स.)।

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे अध्यापन हे विद्यार्थीकेंद्रित असणे आवश्यक असून बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर यांनी केले.

शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-2026 चा आढावा घेण्यासाठी आयोजित सत्रांत बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपेंद्र बेल्लुरकर यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे शैक्षणिक व्यवस्थेचे केंद्रबिंदू असून पालक संपर्कातून त्यांच्या अपेक्षा समजून घेता येतात. त्यामुळे विद्यालयाच्या प्रगतीसाठी सकारात्मक परिणाम घडतो.

यावेळी करुणा कुलकर्णी यांनी शिक्षकांनी उपक्रमशील राहून विद्यार्थ्यांना विषय सुलभतेने समजावून सांगण्यावर भर द्यावा, असे मत व्यक्त केले. शिक्षक हा प्रामाणिक व मेहनती असतो, त्यामुळे स्वतःतील उणिवा ओळखून पुढील वर्षात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे यांनी शिक्षकांचे मनोबल वाढवत आगामी शैक्षणिक वर्षात अधिक जोमाने व उत्साहाने कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

बैठकीत विविध समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. शारदा पुरी यांनी अभ्यासक्रम मंडळाचा अहवाल, दिपाली पवार यांनी अभ्यासपूरक मंडळाचा अहवाल, विनोद मंडलिक यांनी स्पर्धा परीक्षा अहवाल, अमोल गायकवाड यांनी मूल्यमापन विभागाचा अहवाल, तर अनिल कौसडीकर यांनी विस्तारसेवा कार्य समितीचा अहवाल सादर केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande