
छत्रपती संभाजीनगर, 06 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील न्यायव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पैठण येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) सुरू करण्यात आले. या न्यायालयाचे उद्घाटन उच्च न्यायालय, मुंबई येथील न्यायमूर्ती अभय वाघवसे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल यांनी भूषविले.
या नव्या न्यायालयामुळे पैठण व परिसरातील नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी आता जिल्हा मुख्यालयापर्यंत धाव घेण्याची गरज राहणार नाही.
न्यायनिवाडा होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहेत. यावेळी पैठण
येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) म्हणून एल.एच. जाधव यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायालयीन कामकाज अधिक
सक्षम व प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास जिल्हा व अतिरिक्त न्यायालयातील न्यायाधीश आर.डी. गाढवे, जी.व्ही. गांधे, एच.डी. देशिंगे, आर.के. बाफना, एस.एस. रामदीन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. संदीप जाधव, उपाध्यक्ष अॅड. वैभव चव्हाण, सहसचिव अॅड. इमरान शेख, कोषाध्यक्ष अॅड. स्वप्निल उगले यांच्यासह वकीलबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका वकील संघाचे सचिव अॅड. सुभाष खडसन यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis