जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने थॅलेसेमिया जनजागृती सप्ताहाचे आयोजन
नाशिक, 07 मे (हिं.स.)। : ८ मे जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने थॅलेसेमिया जनजागृती अभियान सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात थॅलेसेमिया जनजागृती अभियान अंतर्गत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्य
जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने थॅलेसेमिया जनजागृती सप्ताहाचे आयोजन


नाशिक, 07 मे (हिं.स.)।

: ८ मे जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने थॅलेसेमिया जनजागृती अभियान सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात थॅलेसेमिया जनजागृती अभियान अंतर्गत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. ८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पंचवटी येथे महा गोदाआरती, सिटीसेंटर मॉल थॅलेसेमिया जनजागृती या विषयावर पथनाट्य सादरीकरण करण्यात येणार आहे. दि. ९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता फ्रावशी टाऊन अकॅडमी कॉलेजरोड येथे थॅलेसेमिया बालकांसाठी धमाल, मजा, मस्ती तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या थॅलेसेमिया बालकांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. दि. ९ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जनकल्याण रक्तकेंद्र येथे थॅलेसेमिया बालकांसाठी विशेष थॅलेसेमिया क्लीनिक सुरु करण्यात येणार आहे. दि. १० मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता इस्कॉन श्री श्री राधा मदन गोपाळ मंदिर द्वारका येथे थॅलेसेमिया बालकांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. थॅलेसेमिया डे निमित्त आयोजित सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमास थॅलेसेमिया बालकांनी व पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी, कार्यवाह शैलेश पंडित यांनी केले आहे.

१८० थॅलेसेमिया बालकांसाठी ३८९० रुपये किमतीच्या मोफत आरोग्य तपासणी थॅलेसेमिया जनजागृती अभियान सप्ताह अंर्तगत १८० थॅलेसेमिया बालकांसाठी जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने ३८९० रुपये किंमतीच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार असून यामध्ये सीबीसी रक्ताच्या चाचण्या, २ डी इको, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, टोटल आयर्न बाइंडिंग कॅपॅसिटी (TIBC) चाचणी , सीरम फेरिटिन चाचणी, डोळे, कान, दंत तपासणी मोफत करण्यात येणार आहे.

शैलेश पंडित, कार्यवाह जनकल्याण रक्तकेंद्र, नाशिक

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande