
छत्रपती संभाजीनगर, 11 जून (हिं.स.)। वरुडी, ता. बदनापूर येथील स्वर्गीय दादाराव रंगनाथ पाटील काकडे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आंदोलनादरम्यान बलिदान दिले होते. त्यांच्या त्यागाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांच्या वारसदार श्रीमती मिराबाई दादाराव पाटील काकडे यांना दहा लाख रुपयांच्या आर्थिक सहाय्याचा धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी जालना जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जिल्हा सरचिटणीस अनिलराव कोलते पाटील, तालुकाध्यक्ष भगवान मात्रे, बदनापूर नायब तहसीलदार हेमंत तायडे साहेब, पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र बाबा शिंदे, सरपंच राधा किसन शिंदे, उपसरपंच विष्णू शिंदे, योगेश कान्हेरे, गणेश कोल्हे, पुरुषोत्तम जोशी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वर्गीय दादाराव काकडे यांचे समाजासाठीचे योगदान आणि बलिदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली ही मदत त्यांच्या त्यागाला अभिवादन करणारी असून कुटुंबाला आधार देणारी ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis