छ.संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज बाद,चार उमेदवारांचे अपील दाखल
छत्रपती संभाजीनगर, 11 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ४५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. अर्ज बाद झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत विभागीय सहनिबंधकांकडे अपील करण्याची तरतूद अ
छ.संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज बाद,चार उमेदवारांचे अपील दाखल


छत्रपती संभाजीनगर, 11 जून (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ४५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. अर्ज बाद झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत विभागीय सहनिबंधकांकडे अपील करण्याची तरतूद असून, आतापर्यंत समीर अब्दुल सत्तार, प्रनिकेत पाटील, सुवर्णा संजय जाधव आणि इंदुमती साहेबराव पाटील यांनी अपील दाखल केले आहे. आमदार संजना जाधव, माजी आमदार अण्णासाहेब माने आणि अर्चना पाटील यांचेही अर्ज अवैध ठरल्याने त्यांच्या राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीसाठी २३ जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार असून ४ जुलैला मतदान आणि ५ जुलैला मतमोजणी होणार आहे. एकूण १,११२ मतदार २१ संचालकांची निवड करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande