
सोलापूर, 11 जून (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते जिल्हा उपाध्यक्ष रमेश हसापुरे यांनी काँग्रेस पक्षाला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गळ्यात शेला घालून पक्षात स्वागत केले.
यावेळी राज्य महिला संघटक अनिता माळगे यांची उपस्थिती होती. यानंतर रमेश हसापुरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची ही भेट घेतली त्यांनी हसापुरे यांचे शिवसेनेत स्वागत केले. दक्षिण तालुक्यात शिवसेना पक्ष जोमाने वाढविण्याची ग्वाही यावेळी हसापुरे यांनी दिली.
रमेश हसापुरे यांनी 2009 मध्ये मनसे कडून दक्षिण सोलापूर विधानसभा लढवली होती, यासह सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक सुद्धा लढवली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड