मंगळवेढ्यातील १२ व्या शतकातील दुर्मिळ ब्रह्मदेव मूर्तीच्या जतनासाठी पुढाकार
सोलापूर, 11 जून (हिं.स.)। मंगळवेढ्यातील काशी विश्वनाथ मंदिराजवळील ऐतिहासिक महादेव विहिरीत असलेल्या १२ व्या शतकातील दुर्मिळ ब्रह्मदेव मूर्तीच्या जतन व संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. नगरसेवक अरुण बाळासाहेब किल्लेदार यांच्या पाठपुराव
Gkgd


सोलापूर, 11 जून (हिं.स.)।

मंगळवेढ्यातील काशी विश्वनाथ मंदिराजवळील ऐतिहासिक महादेव विहिरीत असलेल्या १२ व्या शतकातील दुर्मिळ ब्रह्मदेव मूर्तीच्या जतन व संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. नगरसेवक अरुण बाळासाहेब किल्लेदार यांच्या पाठपुराव्यामुळे महादेव विहिरीच्या पुनरुज्जीवनाचे काम मंजूर झाले असून, त्याचबरोबर विहिरीतील ऐतिहासिक ब्रह्मदेव मूर्तीचे संरक्षण व परिसर सुशोभीकरणाचे कामही सुरू करण्यात आले आहे.

इतिहास अभ्यासक ॲड. आनंद देशपांडे आणि बंडू सबनीस यांनी या मूर्तीच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, मूर्तीला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढून योग्य ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सुमारे ६ फूट उंच व ४ फूट रुंद असलेली ग्रॅनाईट दगडातील चतुर्मुख ब्रह्मदेव मूर्ती अत्यंत दुर्मिळ मानली जाते.

मूर्तीचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाने तातडीने हस्तक्षेप करून तज्ज्ञ मार्गदर्शन द्यावे, अशी मागणी इतिहास अभ्यासकांनी केली आहे. या संवर्धन मोहिमेला यश मिळाल्यास मंगळवेढ्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार असून, हा अनमोल वारसा भावी पिढ्यांसाठी जतन होण्यास मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande