बीड शहरात एमआयडीसी तातडीने मंजूर करून कार्यान्वित करण्याची मागणी
बीड, 11 जून (हिं.स.)। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट घेऊन बीड शहराच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या एमआयडीसी संदर्भात सविस्तर चर्चा केली. बीड जिल्ह्यात उद्योगांची उभारणी होऊन स्थानिक यु
अ


बीड, 11 जून (हिं.स.)।

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट घेऊन बीड शहराच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या एमआयडीसी संदर्भात सविस्तर चर्चा केली.

बीड जिल्ह्यात उद्योगांची उभारणी होऊन स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी बीड शहरात एमआयडीसी तातडीने मंजूर करून ती कार्यान्वित करण्याची मागणी यावेळी केली.

यापूर्वी बीड विधानसभा मतदारसंघाचा आमदार असताना या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यावेळी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बीडकरांना एमआयडीसीबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर हा विषय प्रलंबित राहिला. असे त्यांनी सांगितले

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी, उद्योगवाढीसाठी आणि आपल्या युवकांच्या रोजगारासाठी एमआयडीसीची नितांत आवश्यकता आहे. राज्य शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन बीड एमआयडीसी तातडीने मंजूर करून कार्यान्वित करावी,

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande