नॉलेज फोरममध्ये उलगडणार नाशिकच्या विकासाचा रोडमॅप
महापौैर हिमगौरी आहेर साधणार संवाद नाशिक, 11 जून (हिं.स.)। प्रोफेशनल रिएल्टर्स असोसिएशन ऑफ नाशिक तर्फे शनिवार, दि. १३ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता कॉलेजरोड येथील गुरुदक्षिणा संकुलातील पलाश सभागृहात ३५ व्या ’नॉलेज फोरम’चे आयोजन करण्यात आले आहे. याम
Nashik's development roadmap


महापौैर हिमगौरी आहेर साधणार

संवाद

नाशिक, 11 जून (हिं.स.)। प्रोफेशनल रिएल्टर्स असोसिएशन ऑफ नाशिक तर्फे शनिवार, दि. १३ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता कॉलेजरोड येथील गुरुदक्षिणा संकुलातील पलाश सभागृहात ३५ व्या ’नॉलेज फोरम’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महापौर हिमगौरी आहेर-आडके मुख्य प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘नाशिक शहराचा विकास आराखडामहापौरांच्या शब्दांत!‘ या विषयावर त्या प्रकाश टाकणार असल्याची माहिती ’प्राण’चे अध्यक्ष राज तलरेजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सचिन कोतकर, खजिनदार नितीन जांगडा, नॉलेज फोरमचे प्रमुख प्रशांत नहार, प्रदीप रणधीर आदि उपस्थित होते.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, जास्तीत जास्त नागरिक, व्यावसायिक आणि भागधारकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन ’प्राण’चे अध्यक्ष राज तलरेजा, सचिव नितीन कोतकर, विक्रांत आव्हाड, कोषाध्यक्ष नितीन जंगडा, सहखजिनदार अमित वाघ, सल्लागार डी. जे. धामणे, राजेंद्र कोतकर, कैलास कदम, श्रीरंग भदाणे, रवींद्र सूर्यवंशी, प्रशांत नहार, जगदीश बंग, पवन राठी, यश शाह, संजय दुसे, योगेश नेरकर, श्रीकांत पाटेकर, नीलेश येवले, क्षितीज दंडगव्हाळ, मनीष शाह, प्रियांका तलरेजा, भावेश सचदेव, बादल अग्रवाल यांच्यासह संपूर्ण टीमने केले आहे.

महापौरांचा दृष्टीकोन जाणण्याची संधी

सध्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात पायाभूत सुविधांचा विकास साधला जात आहे. या विकासकामांचा बांधकाम क्षेत्रावरही सकारात्मक परिणाम होणार असून, व्यवसायवृद्धीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यादृष्टीने महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचा दृष्टीकोन जाणून घेण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.

सर्वांची महत्त्वाची जबाबदारी

नाशिक वेगाने विकसित होणारे आणि देशातील प्रमुख उदयोन्मुख शहरांपैकी एक आहे. शहराचा विकास हा केवळ शासन किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून त्यामध्ये नागरिक, उद्योजक, व्यावसायिक संस्था आणि रिअल इस्टेट क्षेत्र यांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका असते.

- राज तलरेजा, अध्यक्ष, प्राण

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande