‘निपुण सेतू’ उपक्रमास शासनाची मंजुरी
परभणी, 13 जून (हिं.स.) भारतीय जनता पक्षाच्या गाव चलो अभियान अंतर्गत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची शासन स्तरावर दखल घेत सकारात्मक निर्णय होत असल्याचे उदाहरण गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गोळेगाव येथे पाहायला मिळाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (
‘निपुण सेतू’ उपक्रमास शासनाची मंजुरी


परभणी, 13 जून (हिं.स.) भारतीय जनता पक्षाच्या गाव चलो अभियान अंतर्गत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची शासन स्तरावर दखल घेत सकारात्मक निर्णय होत असल्याचे उदाहरण गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गोळेगाव येथे पाहायला मिळाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अंतिम निवड यादीत स्थान न मिळालेल्या गुणवंत उमेदवारांसाठी राज्य शासनाने निपुण सेतू या महत्त्वपूर्ण उपक्रमास मंजुरी दिली असून या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गोळेगाव येथील युवक उद्धव दुधाटे यांचा सत्कार करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाच्या गाव चलो अभियान अंतर्गत 5 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामकिशन रौंदळे यांनी गोळेगाव (बूथ क्रमांक 178) येथे ग्रामभेट दिली होती. यावेळी मराठा आरक्षण, सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, कृषी पंपांचा वीजपुरवठा, शेतमालाचे दर तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधण्यात आला होता. या संवादादरम्यान गावातील युवक उद्धव दुधाटे यांनी एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत, मुलाखत व कौशल्य चाचणीपर्यंत पोहोचूनही अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी मांडली होती. सदर मागणीसह ग्रामस्थांच्या विविध सूचना व अभिप्राय पक्ष संघटनेमार्फत वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले होते. त्यानंतर राज्य शासनाने 5 जून 2026 रोजी शासन निर्णय जारी करून अंतिम निवडीसाठी शिफारस न झालेल्या एमपीएससी उमेदवारांसाठी निपुण सेतू उपक्रमास मान्यता दिली. या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवूनही अंतिम निवडीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांच्या ज्ञान, कौशल्य व क्षमतेचा उपयोग शासन, उद्योग आणि विविध क्षेत्रांमध्ये होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबद्दल परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी उद्धव दुधाटे यांचा सत्कार करून शासन निर्णयाची प्रत त्यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षांची शासन स्तरावर दखल घेतली जात असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. लोकसहभागातून मांडल्या जाणार्या प्रश्नांवर शासन सकारात्मक निर्णय घेत असल्याचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande