निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांची प्रशांत परिचारक यांच्याशी चर्चा
सोलापूर, 11 जून (हिं.स.)। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरे यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विधान परिषद निवडणुकीतील विविध घडा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांची प्रशांत परिचारक यांच्याशी चर्चा


सोलापूर, 11 जून (हिं.स.)। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरे यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विधान परिषद निवडणुकीतील विविध घडामोडी, प्रचाराची रणनीती तसेच स्थानिक राजकीय परिस्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या भेटीप्रसंगी विधान परिषदेचे उमेदवार राजाभाऊ राऊत उपस्थित होते. तसेच नगरसेवक गणेश दादा वानकर, अजिंक्यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या या बैठकीत संघटनात्मक बांधणी, मतदारांशी संपर्क आणि आगामी निवडणुकीतील नियोजनावर विशेष भर देण्यात आला. या भेटीमुळे निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande