सोलापुरात केळींच्या बागांचे मोठे नुकसान; जिल्हाधिकारी बांधावर
सोलापूर, 11 जून (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात अलीकडे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण केळी बागा कोसळल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. काही दिवसांपूर्वी माळशिरस ताल
Vkfd


सोलापूर, 11 जून (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात अलीकडे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण केळी बागा कोसळल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यात झालेल्या नुकसानीनंतर आता माढा तालुक्यातही केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

माढा तालुक्यातील गारापूर येथे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

शेतकऱ्यांकडून निवेदने स्वीकारत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आणि शासनाकडे अहवाल सादर करून मदतीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जलद गतीने उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande