
बीड, 11 जून (हिं.स.)।
आगीच्या वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे सक्षमीकरण करण्यासाठी बीड विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या मागणीवरून बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन नवीन अत्याधुनिक अग्निशामक वाहने मंजूर केली आहेत. मुंबई येथे झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
मागील काही महिन्यांत बीड शहरात आगीच्या अनेक दुर्घटना घडल्या असून, पालिकेकडे पुरेशी यंत्रसामग्री न सल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. ही बाब पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून दिली व जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याची मागणी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून जिल्हा वार्षिक योजनेतून एक सुसज्ज अग्निशामक वाहन मंजूर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, शासनाच्या योजनेतून पूर्वी मंजूर झालेले परंतु प्रलंबित असलेले दुसरे वाहनही लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यामुळे लवकरच २ नवीन वाहने
बीडमध्ये दाखल होणार आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis