
नाशिक, 11 जून (हिं.स.)।
: द्वारका उड्डाणपुलावर रॉंग साईडचा थरार! उलट्या दिशेने येणाऱ्या स्कूल बसमुळे भीषण अपघात; विंगरमधील प्रवासी जखमी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी नाशिक शहरातील द्वारका परिसरामध्ये घडली आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे
नाशिक शहरातील द्वारका परिसरामध्ये सातत्याने विकास काम सुरू आहे त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तरी देखील काही जण त्याचा वापर करत उड्डाणपूलावरती जाण्याचा प्रयत्न करतात उड्डाणपुलच्या दोन्ही कडील बाजू जाण्यासाठी खुल्या असल्याने या ठिकाणचा वापर केला जातो
नाशिक-मुंबई महामार्गावरील द्वारका परिसरातील उड्डाणपुलाव गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्कूल बस आणि विंगर टेम्पो ट्रॅव्हल्स यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात विंगर ट्रॅव्हल्समधील काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, एमएच 15 ईएफ 0158 क्रमांकाची स्कूल बस द्वारका उड्डाणपुलावरून रॉंग साईडने (उलट्या दिशेने) एनडीसीसी बँकेच्या बाजूने खाली उतरत होती. याचवेळी द्वारकाच्या दिशेने येत असलेल्या एमएच 20 बीसी 7264 क्रमांकाच्या विंगर टेम्पो ट्रॅव्हल्सने बसला जोरदार धडक दिली. धडकेमुळे विंगरमधील काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.द्वारका उड्डाणपुलावर वारंवार होणारे रॉंग साईडने वाहन चालविणे, तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. :::
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV