लातूरमध्ये महायुतीचा जोरदार प्रचार
लातूर, 13 जून (हिं.स.) स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. बसवराजजी पाटील यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राष्ट्रव
बस्वराज पाटील


लातूर, 13 जून (हिं.स.) स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. बसवराजजी पाटील यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आणि नगर पंचायत सदस्यांनी एकजुटीने बसवराज पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीला महायुतीतील वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही बैठकीत बसवराज पाटील यांच्या उमेदवारीचे स्वागत करत कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन केले. उपस्थितांनी विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, नेत्यांनी महायुतीतील समन्वय आणि कार्यकर्त्यांमधील एकजूट हीच निवडणुकीतील सर्वात मोठी ताकद असल्याचा विश्वास व्यक्त केला. लातूरमध्ये बसवराज पाटील यांचा विजय निश्चित मानला जात असल्याचा सूर बैठकीत उमटला.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande