कुंभमेळ्याच्या बोधचिन्हावरून वैष्णव आखाड्यांची नाराजी
नाशिक, 13 जून (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत बोधचिन्हावरून वैष्णव साधू-महंतांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बोधचिन्हात शैवपंथीयांचे प्रतीक असलेल्या त्रिशूलाचा समावेश करण्यात आला असला, तरी वैष्णव पंथाचे प्रतीक असले
कुंभमेळ्याच्या बोधचिन्हावरून वैष्णव आखाड्यांची नाराजी


नाशिक, 13 जून (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत बोधचिन्हावरून वैष्णव साधू-महंतांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बोधचिन्हात शैवपंथीयांचे प्रतीक असलेल्या त्रिशूलाचा समावेश करण्यात आला असला, तरी वैष्णव पंथाचे प्रतीक असलेला धनुष्यबाण वगळण्यात आल्याने प्रशासनाने हा लोगो पुनर्प्रकाशित करावा, अशी मागणी निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर या प्रमुख वैष्णव आखाड्यांच्या वतीने करण्यात आली. संयुक्त पत्रकार परिषदेत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, संजयदास महाराज व महंत भक्तिचरणदास महाराज यांनी ही भूमिका मांडली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साधू-महंतांच्या उपस्थितीत कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले होते. कुंभमेळ्याचा लोगो हा केवळ स्पर्धेतून निवडण्याचा विषय नसून त्याला धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व असल्याने साधू, महंत आणि जगद्गुरू यांच्याशी सल्लामसलत करूनच अंतिम स्वरूप द्यायला हवे होते, असे मत महंतांनी व्यक्त केले. कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत होणारी पुढील बैठक मुंबईऐवजी नाशिकमध्येच होणार आहे, अशी माहिती संजयदास महाराज यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande