अभिषेक बॅनर्जींच्या निवासस्थानी पोलिसांनी कुलूप तोडून घराची झडती घेतल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप
कोलकाता, १३ जून (हिं.स.) पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी घुसून संप
ममता बॅनर्जी  यांचा संग्रहित फोटो


कोलकाता, १३ जून (हिं.स.) पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी घुसून संपूर्ण झडती घेतली. त्यांनी या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, ही अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले आहे.

अभिषेक बॅनर्जी यांच्या पटुआपाडा येथील निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पोलिसांनी कुलूप तोडून संपूर्ण घराची झडती घेतली. त्यांच्या मते, न्यायालयाचे आदेश असूनही अशी कारवाई करण्यात आली, ज्याचा त्यांच्या पक्षाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

शनिवारी पहाटे राज्य पोलीस आणि कोलकाता पोलिसांचे मोठे पथक अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी आत असलेल्या लोकांना बराच वेळ हाक मारली, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी कथितरित्या कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि संपूर्ण झडती घेतली. निवासस्थानाबाहेर केंद्रीय सशस्त्र दलाचे जवानही तैनात करण्यात आले होते.

पोलिसांचे पथक पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. अनेक पोलीस वाहने आणि केंद्रीय दलाच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ थांबल्यानंतर पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि शोधमोहीम सुरू केली.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ममता बॅनर्जीही घटनास्थळी पोहोचल्या. पोलीस सुमारे पाच तास निवासस्थानात थांबले आणि सकाळी ८ वाजल्यानंतर निघून गेले. त्यांच्या निघून गेल्यानंतर ममता बॅनर्जीही निघून गेल्या.

शोधमोहिमेनंतर समोर आलेल्या अभिषेक बॅनर्जीने दावा केला की, पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि प्रत्येक कोपरा तपासला. त्यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रक्रियेची नोंद ठेवण्यात आली होती.या कारवाईत एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह साल्बोनी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारीही सहभागी होते. पण, ही शोधमोहीम कोणत्या विशिष्ट प्रकरणासंदर्भात राबवण्यात आली होती, याबद्दल पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेले नाही.अभिषेक बॅनर्जी विविध तपास यंत्रणांच्या चौकशीखाली आहेत. गुरुवारी, ते राज्य सीआयडीचे मुख्यालय, भवानी भवन येथे हजर झाले आणि विधानसभेच्या बनावट सह्या केल्याच्या कथित प्रकरणात त्यांची पाच तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही चौकशी झाली.उच्च न्यायालयाने यापूर्वी आदेश दिला होता की, त्यांच्यावर दोन आठवड्यांसाठी कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, पण त्यांना तपासात सहकार्य करावे लागेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande