
- जिल्हाधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले- मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा
मुंबई, 14 जून (हिं.स.) । सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे रविवारी भरधाव वेगाने जाणारा टेम्पो विहिरीत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत सहा जणांना वाचवण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्तिकी यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील रंजनी गावातील एकूण 14 जण टेम्पोने म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परतत असताना श्रद्धाळूंचा टेम्पो तांडूवाडी येथील एका शेतातील विहिरीत कोसळला. या दुर्घटनेत इंदुबाई दशरथ बावचे (60), पूजा अमोल सातोरे (23), पूजा बालाजी बावचे (27), अश्विनी संदीप बावचे (27), अश्विनी संदीप बावचे (14), संस्कार संदीप बावचे (14), संस्कृति संदीप बावचे (14), आरव अमोल सातोरे (8) आणि समर्थ बालाजी बावचे (6 महिने) यांचा मृत्यू झाला. तर या घटनेत 6 जणांना वाचवण्यात आले आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकारी एस. कार्तिकी यांनी पंढरपूर–म्हसवड महामार्गावरील दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी या दुर्घटनेच्या त्रिस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला अनेक विहिरी आहेत. त्या विहिरींचे सर्वेक्षण केले जाईल आणि त्यांच्यासाठी सुरक्षात्मक बॅरियर बसवण्याचे निर्देश दिले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ट्विटर’ वर (एक्स) पोस्ट करत म्हटले की, “सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांडूवाडी येथे खासगी शेतातील विहिरीत वाहन कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.” या दुर्घटनेत सहा जणांचे प्राण वाचवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, ते स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात आहेत. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी