टीएमसीच्या 20 बंडखोरांचा नॅशनलिस्ट सिटिझन्स पक्षात विलयाचा दावा
एनडीएसोबत काम करण्याची खासदारांनी केली घोषणा नवी दिल्ली, 14 जून (हिं.स.) : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्या आणि खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी दावा केला आहे की पक्षातील 20 खासदारांचा बंडखोर गट नॅशनलिस्ट सिटिझन्स पक्षात (एनसीपी) विलीन होणार
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र सोपवताना टीएमसी खासदार


एनडीएसोबत काम करण्याची खासदारांनी केली घोषणा

नवी दिल्ली, 14 जून (हिं.स.) : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्या आणि खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी दावा केला आहे की पक्षातील 20 खासदारांचा बंडखोर गट नॅशनलिस्ट सिटिझन्स पक्षात (एनसीपी) विलीन होणार आहे. तसेच, या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन लोकसभेत स्वतंत्र आसनव्यवस्थेची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काकोली घोष दस्तीदार म्हणाल्या की, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसतर्फे (एआयटीएफ) निवडून आलेल्या 20 खासदारांनी अध्यक्षांना संयुक्त पत्र सादर केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या दोन-तृतीयांशपेक्षा अधिक आहे आणि त्यामुळे ते नव्या राजकीय पक्षात विलयाचा दावा करत आहेत.दस्तीदार म्हणाल्या की, आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. तसेच आम्ही त्यांना कळवले आहे की आम्ही नॅशनलिस्ट सिटिझन्स पक्षात विलीन होत आहोत.

तसेच घोष यांनी सांगितले की, एआयटीसीतर्फे निवडून आलेले आम्ही 20 खासदार अध्यक्षांना भेटलो आणि स्वतंत्र आसनव्यवस्थेची मागणी करणारे पत्र दिले. हे 20 खासदार आमच्या एकूण संख्येच्या दोन-तृतीयांशपेक्षा अधिक आहेत. आम्ही नॅशनलिस्ट सिटिझन्स पक्षात विलीन होत आहोत. पुढे आम्ही देशाच्या हितासाठी काम करू आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबत समन्वयाने कार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली. या घडामोडीवर तृणमूल काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया पुढे आलेली नाही. दरम्यान, या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande